Mental health information in Marathi

मानसिक आरोग्यविषयक माहिती मराठीत

On this page you will find translations of our mental health information resources in Marathi. Please carefully read the disclaimer that accompanies each translation. It explains that the College cannot guarantee the quality of the translations, nor that the information is necessarily the most up to date.

सदर पानावर आपण आमच्या मानसिक आरोग्यविषयक माहितीपर संसाधनांचे मराठी भाषांतर पाहू शकता.कृपया प्रत्येक भाषांतरासोबत असलेली टीप काळजीपूर्वक वाचा. ती स्पष्टपणे दर्शवते की महाविद्यालय भाषांतराच्या गुणवत्तेची व माहितीच्या अद्ययावततेची जबाबदारी घेत नाही.

Who are we?

The Royal College of Psychiatrists is the main professional body for psychiatrists in the UK. We have a world-wide membership.

We work to secure the best outcomes for people with mental illness, learning disabilities and developmental disorders by:

  • promoting excellent mental health services
  • training outstanding psychiatrists
  • promoting quality and research
  • setting standards
  • being the voice of psychiatry.

आम्ही कोण आहोत ?

द रॉयल कॉलेज ऑफ सायकियाट्रीस्ट ही यु.के. मधील मानसोपचारतज्ज्ञांकरीताची मुख्य व्यावसायिक संस्था आहे. आमच्याकडे जगभरातील सदस्य आहेत.

आम्ही मानसिक आजार, शिकण्याची अक्षमता आणि विकासात्मक विकार असणार्‍या व्यक्तींसाठी खाली नमूद केलेल्या उपक्रमांद्वारे उत्तम परिणाम शोधायचे कार्य करतो:

  • उत्कृष्ट मानसिक आरोग्य सेवांचा प्रचार करून.
  • मानसोपचारतज्ञांना उत्तम प्रशिक्षण देऊन.
  • गुणवत्ता आणि संशोधनाला पाठिंबा देऊन.
  • मानके ठरवून.
  • मानसोपचारविषयक जागृती करून.

Why do we produce mental health information?

We believe that high-quality information can help people to make informed decisions about their health and care. We aim to produce information which is:

  • evidence-based
  • accessible
  • up to date.

आम्ही मानसिक आरोग्याविषयी माहिती का तयार करतो?

आमचा असा विश्वास आहे की उच्च दर्जाच्या माहितीचा उपयोग करून लोक आरोग्य आणि निगा यांबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात. आम्ही अशी माहिती तयार करु इच्छितो जी:

  • पुरावा आधारित असेल.
  • मिळविण्यास सोपी असेल.
  • अद्ययावत असेल.

How is our information written?

Our information is written by psychiatrists and other healthcare professionals. Our information is also developed with the support of patients and carers. This helps to ensure our information is representative of the lived experiences of people with mental illness.

We are grateful to the psychiatrists, healthcare professionals, College members, staff and experts who have helped to produce and review our information.

आमची माहिती कश्याप्रकारे लिहिली जाते?

आमची माहिती मानसोपचारतज्ञांनी आणि इतर आरोग्यसेवा व्यावसायिकांनी लिहिलेली असते. आमची माहिती रूग्ण आणि त्यांची काळजी घेणार्‍यांच्या सहाय्याने देखील विकसित केली जाते. यामुळे आमची माहिती मानसिक आजार असलेल्या लोकांच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभवांचे प्रतिनिधित्व करणारी आहे याची खात्री बाळगता येते.

आम्ही आमची माहिती तयार करण्यास आणि पुनरावलोकन करण्यास मदत करणारे मानसोपचारतज्ञ, आरोग्यसेवा व्यावसायिक, महाविद्यालयातील सदस्य, कर्मचारी आणि तज्ञ यांचे आभारी आहोत.

About our translations

In 2022, we began collaborating with a non-profit, CLEAR Global, and their community of more than 100,000 language volunteers, Translators without Borders. We are working with them to update the translations of our latest information resources in the most in-demand languages. You can see who delivered our translations at the bottom of each translated page.

Our translations are based on our mental health information resources in English. These resources reflect the best evidence available at the time of writing, and we aim to review our resources every three years. However, this is not always possible, and we have dated our resources to show when they were last reviewed.

Whenever we update our English resources, we will aim to update our translations. However, this will not always be possible.

If you have feedback on our translations you would like to share with us, you can contact leaflets@rcpsych.ac.uk

आमच्या भाषांतरांबद्दल

२०२२मध्ये, आम्ही ना-नफा संस्था, CLEAR Global (क्लिअर ग्लोबल) आणि त्यांचा १,00,000 पेक्षा अधिक भाषा स्वयंसेवक असणार्‍या Translators without Borders (ट्रान्स्लेटर्स विदाऊट बॉर्डर्स) या समुदायाच्या सहयोगाने काम करण्यास सुरुवात केली. आमची नवीनतम माहिती संसाधने सर्वाधिक मागणी असलेल्या भाषांमध्ये भाषांतरित करण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. प्रत्येक अनुवादित पृष्ठाच्या तळाशी आमची भाषांतरे कोणी वितरित केली हे आपण पाहू शकता.

आमची भाषांतरे इंग्रजीतील आमच्या मानसिक आरोग्य माहिती संसाधनांवरआधारित आहेत. ही संसाधने लेखनाच्या वेळी उपलब्ध असलेले सर्वोत्तम पुरावे प्रतिबिंबित करतात आणि दर तीन वर्षांनी आमच्या संसाधनांचे पुनरावलोकन करण्याचे आमचे ध्येय आहे. पण, हे नेहमीच शक्य नसते त्यामुळे आम्ही आमच्या संसाधनांचे शेवटचे पुनरावलोकन केव्हा केले गेले आहे हे दर्शवणारी तारीख नमूद करतो.

आम्ही जेंव्हा जेंव्हा आमची इंग्रजी संसाधने अद्ययावत करू, तेव्हा तेंव्हा आमची भाषांतरे अद्ययावत करण्याचे आमचे ध्येय असेल. मात्र, हे नेहमीच शक्य असेल असे नाही.

भाषांतरांबद्दल आपला काही अभिप्राय असल्‍यास, कृपया आमच्याशी leaflets@rcpsych.ac.ukवर संपर्क साधा.